esakal | मुंबई- पुणे दरम्यान विशेष गाड्या; मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय  | Central railway
sakal

बोलून बातमी शोधा

Express

मुंबई- पुणे दरम्यान विशेष गाड्या; मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय  

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने (central railway) मुंबई आणि पुणे (mumbai-pune) दरम्यान विशेष गाड्या (special train) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01009 विशेष गाडी 18 ऑक्टोबरपासून पुढील सुचनेपर्यंत सीएसएमटीहून (CSMT) दररोज सायंकाळी 5.50 वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री 9.50 वाजता पोहोचेल.

हेही वाचा: वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा

गाडी क्रमांक 01010 विशेष गाडी 18 ऑक्टोबरपासून पुढील सुचनेपर्यंत दररोज सकाळी 6.05 पुणे येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 9.55 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे (फक्त 01009 साठी), कल्याण, कर्जत, लोणावळा, चिंचवड, पिंपरी, खडकी आणि शिवाजी नगर येथे थांबे दिले जाणार आहेत.

या गाडीची संरचना एक वातानुकूलित चेअर कार, 13 द्वितीय आसन श्रेणी असणार आहे. गाडी क्रमांक 01009 आणि 01010 सामान्य शुल्कासह 15 ऑक्टोबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर बुकिंग सुरू होणार आहे. कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी असेल. प्रवासात कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

loading image
go to top