मुंब्रा : कर्तव्यदक्ष टीसीमुळे प्रवाशाला मिळाले हरवलेले पाकीट

mumbra railway station
mumbra railway stationsakal media

मुंबई : मध्य रेल्वेवरील (central railway) मुंब्रा रेल्वे स्थानकावर (mumbra railway station) प्रवासाचे हरविलेले पैशांचे आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट (lost pocket) कर्तव्यावर असलेल्या तिकीट तपासणीसामुळे (Ticket checker) मिळाले. त्यामुळे या प्रवाशाने तिकीट तपासणीसाचे आभार मानले. मंगळवारी, (ता.21) रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकावर वरिष्ठ तिकीट तपासनीस अरविंद कुमार सिंग (Arvind kumar singh) कर्तव्यावर होते. यावेळी त्यांना स्थानकावर पैशांचे पाकीट दिसून आले. त्यांनी हे पाकीट त्वरित उचलून रेल्वे सुरक्षा बलाशी संपर्क (RPF) करून माहिती दिली. तसेच स्थानक प्रबंधकाना घटनेची माहिती दिली.

mumbra railway station
दहावीच्या विद्यार्थ्यांना जलसुरक्षा विषय अनिवार्य

तेव्हा पाकीट उघडून बघितले असता, काही रोख रक्कम, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड यांसारखी अत्यावश्यक कागदपत्रे होती. पाकिटामध्ये प्रवाशाचा संपर्क क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क क्रमांक न मिळाल्याने पाकीट तसेच ठेवले. काही वेळानंतर स्थानक परिसरात एक प्रवासी काही तरी शोधत असल्याचे कुमार सिंग यांना दिसले. त्या प्रवाशाने पाकिटाबाबत सिंग यांच्याकडे चौकशी केली. सिंग यांनी कोणत्या रंगाचा पाकीट आहे, किती पैसे आहेत, कोणते कागदपत्रे आहेत, अशी खात्री पटण्यासाठी प्रश्न विचारले. संपूर्ण खात्री पटल्यावर प्रवासी अब्दुल खान यांच्याकडे कुमार सिंग यांनी पाकीट सुपूर्द केले. खान यांना पाकिटातील सर्व रक्कम, सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहे की नाही याची तपासणी करण्यास लावले. यावेळी आरपीएफ कर्मचारी मुकेश यादव उपस्थित होते. खान यांनी सर्व रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.

"हरविलेले पाकीट प्रवाशाला मिळाले, यातच खूप मोठा आनंद आहे. या कामात स्थानक प्रबंधक, रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी यांनी मदत केली."

- अरविंद कुमार सिंग, वरिष्ठ तिकीट तपासनीस, मुंब्रा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com