

Central Railway Special Megablock
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकच्या कामासाठी २४ आणि २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. आसनगाव ते आटगावदरम्यान उच्चदाब वीजवाहिन्यांचे टॉवर हटविण्यात येणार असल्याने लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.