
Mumbai News : मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट; पार्सल वाहतुकीतून २३२.५० कोटी रुपयांची कमाई !
मुंबई : मध्य रेल्वेची चालू आर्थिक वर्षात कामगिरी प्रभावी ठरली असून, प्रवासी भाडेव्यतिरीक्त ७६. ८६ कोटी आणि पार्सल महसूल २३२. ५० कोटीचे विक्रमी महसूल गोळा केला आहे. मध्य रेल्वेच्या आतापर्यतच्या प्रवासी भाडेव्यतिरीक्त सर्वाधिक महसूल असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम ठेवत, मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते फेब्रुवारी) मध्ये ४.५६ लाख टन पार्सल आणि सामान वाहतूकीतून सुमारे २३२.५० कोटी (फक्त फेब्रुवारी महिन्यातील १७.९६ कोटींसह) चे लक्षणीय उत्पन्न देखील नोंदवले आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये याच कालावधीत,
वेळापत्रकानुसार पार्सल गाड्यांच्या २०१ फेऱ्यांमधून २४.८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - शालीमार पार्सल ट्रेनच्या ९९ फेऱ्यांमधून १४.९७ कोटी, भिवंडी - जळगाव ते आजरा ३० इंडेंट पार्सल ट्रेनच्या माध्यमातून ६.२५ कोटी आणि गोधनी ते तिनसुकिया जंक्शन पर्यंतच्या लीज पार्सल ट्रेनच्या २२ फेऱ्यांमधून ३.५९ कोटी उत्पन्न मिळवले आहेत.
१९१ टक्यांची प्रचंड वाढ -
आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल ते फेब्रुवारी) मध्ये मध्य रेल्वेचे नॉन-फेअर महसूल कामगिरी ७८.८६ कोटी हे गतवर्षीच्या याच कालावधीतील २७.१० कोटीच्या तुलनेत प्रभावी ठरली असून १९१ टक्यांची प्रचंड वाढ दर्शवित आहे तसेच सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये सर्वाधिक आहे.