
मुंबई : रेल्वेतील प्रचंड गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सोय व्हावी यासाठी मध्य रेल्वेने अभिनंदनीय पाऊल उचलले आहे. माटुंगा रेल्वे वर्कशॉपच्या तंत्रज्ञांनी विशेष पुढाकार घेत एक मालडबा पूर्णतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित केला असून, त्यातून १५ प्रवाशांच्या अतिरिक्त आसन क्षमतेचा लाभ मिळणार आहे.