सुरक्षेसाठी मध्ये रेल्वेने शाेधली नवीन आयड्या

सुरक्षेसाठी मध्ये रेल्वेने शाेधली नवीन आयड्या

मुंबई ः जोरदार वाऱ्यामुळे वाकलेले झाड ओव्हरहेड वायरवर आले आणि त्याला आग लागल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. मरीन लाईन्स नजिकच्या या घटनेने मध्य रेल्वेचे आधिकारी चांगलेच सतर्क झाले आहेत. मध्य रेल्वेने आता आधिकाऱ्यांना ओव्हरहेडवर येण्याची शक्यता असलेल्या झाडांची छाटणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ट्रकजवळील झाडांची छाटणी करण्याची प्रक्रिया या आठवड्यात सुरु झाली आहे. रविवारी दहा ठिकाणच्या झाडांची छाटणी करण्यात आली. खास क्रेन, तीन टॉवर वॅगन आणि शिडीच्या मदतीने हे काम केले जात आहे, असे मध्य रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. 
गेल्या आठवड्यात मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी झाड वाकले आणि ते ओव्हरहेड वायरवर पडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच त्या मार्गावरील वाहतूकही स्थगित करण्यात आली होती. ओव्हरहेड वायरमधून 25 हजार किलोवोल्टने विद्युत प्रवाह जात असतो. या वायरचा स्पर्श झाल्यास कमालीचा जोरदार इलेक्ट्रिकचा झटका बसतो. त्याचा स्पर्श जीवावर बेतू शकतो. 

मध्य रेल्वेने पावसाळ्याची पूर्वतयारी करतानाच अनेक झाडांची तसेच फांद्याची छाटणी केली होती. मात्र गेल्या आठवड्यात वाऱ्यांचा वेग खूपच जास्त होता. त्यामुळे अनेक जुनी झाडे तसेच फांद्या पडल्या आहेत. त्यामुळे ती ट्रेनजवळ जास्त आली आहेत. त्यामुळेच नव्याने पाहणी सुरु झाली आहे आणि उपाय केले जात आहेत. पावसाळा संपेपर्यंत ही पाहणी सुरु राहणार आहे, असे रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी सांगितले. 
पश्चिम रेल्वेने जून महिन्यात बृहन्मुंबई महापालिका आधिकाऱ्यांच्या मदतीने ही पाहणी केली होती. त्यापैकी 1 हजार 591 झाड्यांच्या फांद्या कापण्यात आल्या होत्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com