Mumbai Railway : भायखळा रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे वाहतुकीचे वाजले तीन तेरा; प्रवाशांचे प्रचंड हाल!

लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या
central railway signal failure Byculla down line trains running late by 10-15 minutes mumbai
central railway signal failure Byculla down line trains running late by 10-15 minutes mumbaisakal

मुंबई : मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकात सिग्नल बिघाडामुळे सोमवारी (ता.१०) सायंकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे अप- धीमी आणि अप जलद लोकल सेवा खोळंबल्या होत्या. या घटनेमुळे सीएसएमटीकडून जाणाऱ्या लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आज सोमवारी सायंकाळी ४. ०७ वाजण्याच्या सुमारास भायखळा रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दादर, ठाणे, कल्याणकडून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली.

central railway signal failure Byculla down line trains running late by 10-15 minutes mumbai
Central Railway : मध्य रेल्वेची पार्सल वाहतूक सुसाट! वाहतुकीतून ६७.७७ कोटी रुपयांची कमाई!

परिणामी लोकलच्या एका मागोमाग एक रांगा लागल्याने गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे लोकल गाड्यामध्ये प्रवासी अडकून पडले होते. या घटनेची माहितीने मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले. अवघ्या काही मिनिटात हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती.

central railway signal failure Byculla down line trains running late by 10-15 minutes mumbai
Mumbai Fraud : भाजप पदाधिकाऱ्याचा कॉंग्रेस पदाधिकाऱ्याला 2 लाखाचा चुना

या घटनेचा परिणाम मध्य रेल्वे उपनगरील लोकल सेवांवर रात्री ७ वाजेपर्यत दिसून आला. लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क लागला आहे. पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी हैराण झाले आहे. दर रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेऊन बिघाड घटना घडतच असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या कारभावर नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com