Mumbai Local Megablock: मध्य रेल्वेवर १५ तास मेगाब्लॉक, लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार; प्रवाशांचे हाल होणार

Central Railway Megablock : मध्य रेल्वेवर १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
Central Railway 15 hours Megablock

Central Railway 15 hours Megablock

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या कळवा-कसारा तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी खर्डी यार्डमध्ये नॉन-इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी शनिवारी (ता. २५) दुपारी १२ ते रविवारी (ता. २६) पहाटे ३ वाजेपर्यंत उंबरमाळी-आटगावदरम्यान १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत आसनगाव ते कसारादरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com