Kasara Megablock: कसारा मार्गावर विशेष ब्लॉक, दोन दिवस रेल्वे सेवांना फटका; कसे असेल वेळापत्रक?

Central Railway Special Megablock: मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी कसारा मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on: 

मुंबई : मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी कसारा यार्डात ओव्हरहेड वायरची जोडणी करण्यात येणार आहे. यासाठी ३० आणि ३१ ऑक्टोबरच्या रात्री विशेष वाहतूक व विद्युत ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील, तर कसारा येथून सुटणाऱ्या दोन लोकलना उंबरमाळी आणि खडीं स्थानकांवर थांबा मिळणार नाही.

Loading content, please wait...