Railway
Railway sakal media

Good News : मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली रेल्वे सेवा पूर्ववत

मुंबई : मध्य रेल्वेच्या (central railway) घाट भागात जोरदार पाऊस (Heavy Rainfall) कोसळल्याने रेल्वे रुळांचे, ओव्हर हेड वायरचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रेल्वे रुळाखालील खडी वाहून जाणे, माती साचणे, पाणी तुंबणे, झाडे पडणे अशा घटना घडल्या. त्यामुळे टिटवाळा ते इगतपुरी (Titwala To igatpuri) आणि अंबरनाथ ते लोणावळा (Ambarnath-lonavala) रेल्वे सेवा ठप्प होती. मात्र, पावसाचा जोर कमी होत असताना आणि पायाभूत कामे पूर्ण केल्यानंतर रेल्वे सेवा पूर्वरत (Railway Strats) करण्यात आली. ( Central Railway Starts After heavy rainfall problems - nss91)

मध्य रेल्वे प्रशासनाने दोन स्थानकाच्या दरम्यान गाड्या अडकून पडू नये, यासाठी विशेष काळजी घेत, कसारा, इगतपुरी, बदलापूर, खडवली या स्थानकांवर गाड्यांचे नियमन केले. अनेक गद्यार्द्द केल्या. तर, काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. तर, काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन केले. यासह मध्य रेल्वेच्या एका पथकाने रेल्वे रुळावर पडलेली झाडे, दगड, दरड बाजूला करण्याचे काम केले. दक्षिणपूर्व घाटावर सुमारे 17 ठिकाणी भूस्खलन, पावसाच्या अडथळ्यांची ज्यात 3 ठिकाणी जास्त प्रमाणात नुकसान झाले होते. 200 मजुरांसह 4 जेसीबी आणि 2 पोकलेन नुकसानग्रस्त ठिकाणी पोहोचले. येथे युद्धपातळीवर काम केले जात आहे. थळ घाटातील अडकलेल्या तीन गाड्या आणि बोर घाटातील अडकलेल्या एका गाडीला सुरक्षित मार्ग तयार करून जवळच्या स्थानकापर्यंत नेण्यात आल्या. तर, एनडीआरएफच्या टीमला बोलावून कसारा येथे आपत्कालीन घटनेसाठी तयार ठेवले होते.

Railway
मराठी कामगार सेनेचा कार्य अहवाल मोबाईल अॅपवर, कृष्णकुंजवर लोकार्पण

रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने बुधवारी, (ता.21) रोजी 10.15 च्या सुमारास उंबरमाली ते कसारा आणि इगतपुरी ते खर्डी रेल्वे सेवा बंद केली. त्यानंतर मध्य रात्री 1 वाजता अंबरनाथ-बदलापूर, वांगणी-अंबरनाथ रेल्वे सेवा बंद केली. पावसाचा जोर वाढल्याने आणि दरड कोसळण्याच्या घटना झाल्याने टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा रेल्वे सेवा सकाळी 6 वाजेच्या सुमारास बंद केली. उपनगरीय रेल्वे मार्गावरून फक्त सीएसएमटी ते अंबरनाथ / टिटवाला विभागात धावत होत्या. सकाळी 10.30 वाजता सीएसएमटी ते बदलापूरपर्यंत सेवा सुरू केल्या. उत्तर- पूर्व घाट विभागातील अप व डाऊन मार्ग लाईन्स दुपारी 1.15 वाजता सुरक्षित करण्यात आला. आणि दुपारी 3 वाजता कल्याण-कसारा विभागावर लोकल सेवा सुरू केली. यादरम्यानच्या काळात हार्बर लाइन, ट्रान्स हार्बर लाइन आणि चौथा कॉरिडोर (नेरुळ / बेलापूर-खारकोपर विभाग) सेवा सुरु होत्या.

उंबरमाली पहाटे 5.30 वाजता डाऊन लाईन व 7.15 वाजता अप लाईन मार्ग सुरक्षित केला. अंबरनाथ-बदलापूर विभाग 12 तासांत दुरुस्त करण्यात आला आणि उपनगरी सेवा अंबरनाथ ते बदलापूरपर्यंत सकाळी 10.35 वाजता वाढविण्यात आल्या. दरम्यान रात्री उशिरापर्यंत बदलापूर-लोणावळा भागात युद्धपातळीवर काम सुरू होते.

पनवेल-कर्जत विभागातील खडी भरुन घेण्यात आले आणि सकाळी 10.15 वाजता ट्रॅक फिट देण्यात आले. वासिंद - खडावली विभागात 100 हून अधिक मजूर काम करीत आहेत. दुरुस्तीचे काम दुपारी 1.21 वाजता पूर्ण झाले. कसारा-इगतपुरी दरम्यान दुपारी 1.12 वाजता अप आणि डाऊन लाईन दुरुस्त करण्यात आले. बदलापूर ते कर्जत दरम्यान भिवपुरी रोड येथे सुमारे 25 मजूर सेवा पूर्ववत करण्याच्या कामावर आहेत. बदलापूर वांगणी विभागातील पुराचे पाणी कमी झाल्यावर रुळांच्या स्थितीचे मूल्यांकन केले जात होते.

- इंटरसिटी गाड्यांसह लांब पल्ल्याच्या 34गाड्या रद्द केल्या.

- लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले

- इंटरसिटी गाड्यांसह लांब पल्ल्याच्या 36 गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या.

- लांब पल्ल्याच्या 6 गाड्या टर्मिनेट केलेल्या स्थानकातूनच सोडण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com