esakal | मराठी कामगार सेनेच्या कार्य अहवाल मोबाईल अॅपवर, कृष्णकुंजवर लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Raj Thackeray

मराठी कामगार सेनेचा कार्य अहवाल मोबाईल अॅपवर, कृष्णकुंजवर लोकार्पण

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : कामगारांना त्यांच्या न्याय हक्क, योजनांची (Worker Justice) माहिती देणारे आणि त्यांच्यासाठी मराठी कामगार सेनेच्या( Marathi Worker Union) कार्याची माहिती देणारे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. दरम्यान गुरुवारी कृष्णकुंज येथील मनसे(MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या घरी या अॅप चे लोकार्पण करण्यात आले. (MNS Chief Raj Thackeray inaugurated Mobile app For Workers Justice-nss91)

महाराष्ट्रातील मराठी कामगार बंधू भगिनींच्या अडीअडचणी आणि प्रश्नांसाठी मनसे प्रणित मराठी कामगार सेना गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहे.कोरोनाच्या गेल्या दीड वर्षाच्या काळातही मराठी कामगार सेने मार्फत कामगारांना मदत करण्यात आली त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या पगारापासून ते आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी मराठी कामगार सेना या कामगारांच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिली आहे.

हेही वाचा: पावसाळी दुर्घटनांच्या प्रस्तावावरुन शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी

बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार आता मराठी कामगार सेनेने कामगार बंधू भगिनींच्या सोयीसाठी त्यांना मदत व्हावी यासाठी मराठी कामगार सेनेचा ऍप बनवला आहे. हा ऍप डाउनलोड केल्या नंतर कामगारांना मराठी कामगार सेने विषयी इत्यंभूत माहिती मिळणार आहे.कामगार कायदे या विषयी ही कामगारांना माहिती मिळणार आहे त्यातून कामगारांमध्ये ही जागृती निर्माण होणार आहे.

कामगारांना काही अडचणी असतील त्यांच्या काही सूचना असतील तरी कामगार ऍप वर जाऊन त्या मांडू शकतात त्याची तात्काळ मराठी कामगार सेने मार्फत नोंद घेतली जाईल आणि त्यावर काम ही केले जाईल.ऍप सोबतच या संदर्भात मराठी कामगार सेनेच्या कार्यालयाकडून कामगारांना संपर्क साधून ही माहिती देण्यात येईल.महत्वाचे म्हणजे या ऍप च्या द्वारे कामगारांना मराठी कामगार सेनेचे प्राथमिक सदस्यत्व ही स्वीकारता येणार आहे.

- महेश जाधव, अध्यक्ष, मराठी कामगार सेना

loading image