मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात ‘२६/११’च्या हल्ल्यानंतर तेथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हापासून उपनगरी आणि मेल-एक्स्प्रेसच्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.
Latest Mumbai News : देशातील सर्वात गजबजलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus CSMT) येथे लवकरच अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन (Scanning Machine) बसवण्यात येणार आहे. दररोज साडेअकरा लाखांहून अधिक प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.