

Central Railway Timetable Disruption
ESakal
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांना गुरुवारी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. टिटवाळा आणि खडवली स्थानकांदरम्यान अवघ्या काही तासाच्या फरकाने तांत्रिक बिघाड झाल्याने ४८ लोकल रद्द करण्यात आल्या, तर शंभरहून अधिक फेऱ्यांना विलंब झाला. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक दिवसभरासाठी विस्कळित झाले. त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.