मध्य रेल्वेची जोरदार कारवाई; 2 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसुली

मध्य रेल्वेची जोरदार कारवाई; 2 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसुली
Updated on

मुंबई, ता. 12 : मध्य रेल्वेद्वारे विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविली गेली आहे. 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशासाठी लोकल सेवा सुरू केली. तर 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना मर्यादित वेळेसाठी लोकल प्रवास सुरु केला आहे. मात्र, यावेळी 2 लाख 38 हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. यातून मध्य रेल्वेने 7 कोटी 61 लाखांचा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 15 जून 2020 ते 28  फेब्रुवारी 2021 पर्यंत उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये सखोल व नियमित तिकीट तपासणी मोहीम चालविली. या तपासणीदरम्यान विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची 2 लाख 38 हजार प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यातून  दंड 7 कोटी 61 लाख रुपयांचे वसूल करण्यात आले. सुमारे 1 लाख 75 हजार प्रकरणे उपनगरी लोकलमध्ये आढळली आणि यातून दंड 5 कोटी 10 लाख  लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये 63 हजार प्रकरणांमधून 2 कोटी 51 लाख दंड वसूल करण्यात आला, अशी माहीती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहीमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अनियमितता तिकीटमध्ये घेण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

central railways action against without ticket local users more than 7 crore fine collected

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com