
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रवासी भाड्यातून ४,९६६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ४,६९९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते.
मध्य रेल्वेने एकूण १३८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. यात १२२ दशलक्ष उपनगरी आणि १६ दशलक्ष गैर-उपनगरी प्रवाशांचा समावेश आहे. या महिन्यात रेल्वेने ५५४ कोटी रुपयांचा महसूल मिळवला, ज्यात ८४ कोटी उपनगरी तर ४७० कोटी गैर-उपनगरी उत्पन्नाचा वाटा होता.
---