esakal | पुढच्या १५ दिवसात महाराष्ट्राला मिळणार २३ लाख लसींचे डोस

बोलून बातमी शोधा

Corona special vaccination

पुढच्या १५ दिवसात महाराष्ट्राला मिळणार २३ लाख लसींचे डोस

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात महाराष्ट्रला कोरोना प्रतिबंधक लसीचे २३ लाख डोस देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुनिवारी जाहीर केले. लसींचा हा साठा कधी आणि किती प्रमाणात येणार, त्याबद्दल सूचना मिळालेली नाही, असे राज्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही आधी सांगितलं होतं, त्याप्रमाणे आम्हाला सोमवारपासून लसीकरण सुरु करायचं आहे. पण आम्हाला अजून केंद्राकडून लसींचा साठा मिळालेला नाही, असे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्याला लसींच्या नव्या येणाऱ्या साठ्याबद्दल कोणीतीही सूचना मिळालेली नाही. कमी वेळेतही सेंटर्सवर लसीकरण सुरु होऊ शकते, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. "४५ वर्षापुढील वयोगटासाठी आम्ही केंद्राकडे पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करण्याची मागणी केली आहे. लसींच्या कमतरतेमुळे राज्यातील बहुतांश भागात लसीकरण बंद आहे" असे टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा: Live: तृणमूल कार्यकर्त्यांचा जल्लोष; निवडणूक आयोग आक्रमक

"महाराष्ट्रात लसीकरण सातत्याने सुरु ठेवण्यासाठी आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे" असे टोपे म्हणाले. शनिवारपासून महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरु झाले. पण ते प्रतिनिधीक स्वरुपात होते. या वयोगटासाठी सीरमकडून महाराष्ट्राला ३ लाख लसींचा साठा मिळाला आहे. हा तीन लाख लसींचा साठा अशा पद्धतीने वितरीत करण्यात आला आहे की, आठवडाभर लसीकरण सुरु राहील. त्यात खंड पडणार नाही.