
मुंबई : सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस ही एक गंभीर समस्या आहे. तरुणांमध्ये हे प्रमाण वाढत असून, यात मानदुखी, पाठदुखी, तोल जाणे, हातापायाला बधिरपणा, कमजोरी, असे त्रास जाणवू लागले आहेत. त्यामुळे मान-पाठीच्या दुखण्यांना हलक्यात घेऊ नका, अशा समस्या जाणवू लागल्यावर तातडीने तपासणी करा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.