CET हुकलेल्या विद्यार्थ्यांची 7 नोव्हेंबरला परीक्षा; दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार

CET हुकलेल्या विद्यार्थ्यांची 7 नोव्हेंबरला परीक्षा; दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार

मुंबई, ता. 4 : अतिवृष्टी, खंडित झालेला वीजपुरवठा आणि इतर कारणांमुळे सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले. ही परीक्षा 7 नोव्हेंबरला सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. नैसर्गिक आपत्ती परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला होता.

एमएचटी सीईटी परीक्षेचे आयोजन 1 ते 9 ऑक्टोबर आणि 12 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले होते. मात्र नैसर्गिक आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना 22 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत परीक्षेसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

परीक्षेची संधी हुकलेल्या 4188 विद्यार्थ्यांनी पीसीएम व पीसीबी गटाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यानुसार 7 नोव्हेंबरला राज्यातील 45 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 12 च्या सत्रात पीसीबी तर दुपारी 2.30 ते 5.30 च्या सत्रात पीसीएम गटाची परीक्षा होणार आहे.

ज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून हॉलतिकिट डाऊनलोड करून घेता येणार आहे. परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अ‍ॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली असल्याची महिती सेलकडून देण्यात आली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

CET re exams for those who missed exams due to natural calamity will be held on seventh November

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com