esakal | Admission: 'CET' वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट!
sakal

बोलून बातमी शोधा

Website

Admission: 'CET' वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट!

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : दहावीच्या निकालानंतर (SSC Result) राज्य शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका पडल्याचे उदाहरण ताजे असतानाच आज अकरावी प्रवेशासाठी (Eleventh Admission) घेण्यात येणाऱ्या सीईटीची वेबसाईटही (CET Website) क्रॅश झाल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना (Student) याचा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (CET website crash all student faces problem Angry towards Education system -nss91)

सकाळी 11:30 ला अकरावीच्या सीईटी नोंदणीला सुरुवात झाली होती. मात्र तेव्हापासून यासाठी असलेली वेबसाईट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत आपली नोंदणी करता आली नाही. त्यानंतर सुरू झालेल्या दिवसाअखेर म्हणजे रात्री 8.30 वाजेपर्यंत 1 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: देशमुखांनी CBI विरोधात केलेल्या याचिकेवर गुरुवारी निर्णय- HC

दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी वर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इयत्ता आठवीपासून तंत्र शिक्षण शिकवणाऱ्या तंत्रशाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उभा राहीला आहे. अकरावीसाठी घेण्यात येणारी ही प्रवेश परीक्षा गणित, इंग्रजी, विज्ञान आणि समाजशास्त्र या चार विषयांची होणार आहे. मात्र तंत्रशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्र हा विषय अभ्यासात नसतो.

मग या विद्यार्थ्यांना एका महिन्यात हा अभ्यास शिकावा का? असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. याबाबत सरकारने आपली भूमिका मांडावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही शिक्षण आयुक्तांना पत्र लिहून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे. एनएसक्यूएफ च्या अभ्यासक्रमानुसार मॅकेनिकल टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यासारख्या विषयांची निवड करून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हिंदी किंवा समाजशास्त्र या विषयांतून सूट असते. यामुळे अशा विद्यार्थ्यांची 100 गुणांऐवजी 75 गुणांची परीक्षा घ्यावी अशी मागणी केल्याचे परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

loading image