सीईटीच्या पीसीबी ग्रुपचे हॉलतिकीट देण्यास सुरुवात; असे मिळणार हॉलतिकिट

तेजस वाघमारे
Monday, 28 September 2020

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) मार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी पीसीबी ग्रुपमधून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीत उपलब्ध करून दिले आहेत.

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) मार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी पीसीबी ग्रुपमधून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीत उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून अर्ज भरले आहेत त्याच विद्यार्थ्यांची हॉलतिकीटे उपलब्ध झाली आहेत.

शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

एमएचटी-सीईटी परीक्षा 1,2,4,5,6,7,8 आणि 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांचा परिक्षा अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करता येईल. पीसीएम ग्रुप परीक्षेच्या हॉलतिकीटा संदर्भात नंतर सूचना देण्यात येणार आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारी विषयीदेखील हॉलतिकीटावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन सीईटी सेलच्या वतीने करण्यात आले आहे. पाच लाख विद्यार्थ्यांनी पीसीएम आणि पीसीबी कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. 

फडणवीस-राऊत बैठकीनंतर, शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

असे मिळणार हॉलतिकिट
- mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.
- अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
- आता स्क्रीनवर तुमचे हॉलतिकिट दिसेल.
- हॉलतिकिट डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CETs PCB Group begins issuing tickets This is how Holtikit will get