पोलिसांच्या मदतीसाठी तर मुंबई गाठायचीये पण..., मंत्रालयातील कर्मचारी दुविधेत

police
police

मुंबई : कायदा सुव्यवस्था राखण्यासोबत मजूरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. कामाच्या तणावामुळे मुंबई पोलिस थकल्याने त्यांच्या मदतीला 1429 मंत्रालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठवण्याचा आदेश सरकारने काढला; मात्र त्यापैकी जवळपास 85 टक्के कर्मचारी आपापल्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यामुळे कामावर हजर कसे रहायचे, हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

12 पोलिस झोनअंतर्गत येणाऱ्या पोलिस स्टेशनमध्ये या कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत मुंबई गाठणे आणि कामावर रुजू होण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे. ड्यूटीवर हजर न झाल्यास कारवाईची टांगती तलवारही या कर्मचाऱ्यांवर आहे. सध्या मंत्रालयात केवऴ 5 टक्के कर्मचारी काम करत आहेत.  उर्वरीत  कर्मचारी आपआपल्या जिल्ह्यात निघून गेले होते. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कुठलाही वाहनचालक मुंबईत येण्यास तयार नाही. शिवाय मुंबईत येण्यासाठी प्रवास पासही या कर्मचाऱ्यांना मिळवावा लागणार आहे. 22 तारखेला या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश आहेत. त्यामुळे मुंबईसाठी सुरक्षित वाहतूक  व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत रुजू होण्यासाठी थोडा अवधी देण्यात यावा, अशी  विंनती मंत्रालय कर्मचारी संघटनांनी शासनाकडे केली आहे. 

पोलिसांवरील भार कमी होणार
सध्या कोरोनामुळे  मुंबई पोलिस दलातील 55 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील  20 टक्के पोलिस कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. अनेकांना क्वांरटाईन व्हावे लागले आहेत. त्यामुळे पोलिंसावरील कामाचा ताण वाढला आहे. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांमुळे मजुरांची माहिती नोंदवण्यासाठी आणि मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील भार कमी होईल, अशी प्रतिक्रिया कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त  विनय कुमार दुबे यांनी दिली.

The challenge of reaching Mumbai to help the police
The majority of ministry staff are stuck in the village

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com