सावधान..! मुंबईत "या" वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मुंबईतील कोरोनाचे तब्बल 62 टक्के रुग्ण पन्नाशीच्या आतील, तर 30 ते 49 वयोगटातील रुग्णांची संख्या 38.99 टक्के आहे. कोव्हिडवर मात करणाऱ्यांमध्ये 10 ते 29 वर्षे वयोगटाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

मुंबई : शहरातील कोरोनाचे तब्बल 62 टक्के रुग्ण पन्नाशीच्या आतील, तर 30 ते 49 वयोगटातील रुग्णांची संख्या 38.99 टक्के आहे. कोव्हिडवर मात करणाऱ्यांमध्ये 10 ते 29 वर्षे वयोगटाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

ही बातमी वाचली का? व्हॉट्‌सअॅप, फेसबुक वापरताना काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो...

मुुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 28 टक्के रुग्णांनी कोव्हिड-19 विषाणूवर मात केली आहे. मुंबईत गुरुवारी सायंकापर्यंत 23 हजार 847 रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी 6751 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

ही बातमी वाचली का? लॉकडाऊन ४.० : मुंबईत आजपासून काय सुरु होणार? 

शहरात 30 ते 49 वर्षे वयोगटातील 9299 रुग्ण आढळल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट होते. महाराष्ट्रासह देशातही याच वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त आहे. वयाच्या 55 व्या वर्षानंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. मुंबईत 50 वर्षांवरील 8750 रुग्ण आहेत. 50 ते 69 वयोगटातील 22 टक्के आणि 70 वर्षांवरील 15 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 10 ते 29 वयोगटातील 35 टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

ही बातमी वाचली का? अरे किती हिणवणार? भाजपच्या आंदोलनाची रोहित पवारांकडून खिल्ली

वयोगट (वर्षे)           रुग्ण        डिस्चार्ज       डिस्चार्ज (टक्के)        रुग्ण (टक्के)

10 पर्यंत                481          155           32                        2
10 ते 29              5313        1912           35                      22.27
30 ते 39              9299        2852           30                      38.99
50 ते 69              7131        1583           22                      29.90
70 वरील              1619         249             15                       6.78

एकूण                   23,847      6751            28                      10


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 62% patients in Mumbai under 50 age! Up to the most corona free thirty