esakal | चंद्रकांत पाटील यांनी लेखी माफी मागावीIsanjay raut
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

चंद्रकांत पाटील यांनी लेखी माफी मागावी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः “चंद्रकांत पाटील यांना माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकारक, निराधार आणि बोगस टिप्पण्या केल्याबद्दल मी कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाईन” असा इशारा संजय राऊत यांनी दिला असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादावर ‘सामना’त अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखावर प्रतिक्रिया देणारे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लिहिले होते. त्यामध्ये संजय राऊत यांच्या पत्नीवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. संजय राऊत यांनी वकिलामार्फत बजावलेल्या नोटिशीमध्ये, येत्या सात दिवसात पाटील यांनी बिनशर्त लेखी माफी ‘सामना’मधूनच मागितली नाही तर मानहानीची कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबला जाईल.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

‘ईडी’चा सोयीनुसार वापर

सक्तवसुली संचालनालय (ईडी) ही देशातील प्रतिष्ठीत यंत्रणा आहे, मात्र राजकीय हेतूने या यंत्रणेचा वापर केला जात असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे. ‘ईडी’ सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना धमकावण्यासाठी तुमच्याकडून सोयीप्रमाणे केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

loading image
go to top