महिनाभरात पूर्ण होणार जमीन मोजणी प्रकिया, २०० खासगी भूमापकांची नियुक्ती; महसूलमंत्र्यांची माहिती

Chandrashekhar Bawankule: राज्यात २०० खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मोजणीची प्रक्रिया १५ ते ३० दिवसांत पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांची दिली.
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

Esakal

Updated on

मुंबई : राज्यातील भूमी अभिलेख विभागाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित राहणाऱ्या मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तब्बल २०० खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या ३० मार्चपासून ते प्रत्यक्ष कामावर रुजू होणार असून, मोजणीची प्रक्रिया किमान १५ ते कमाल ३० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com