दहावी-बारावी परीक्षेचा पॅटर्न बदला; शिक्षक आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तेजस वाघमारे
Sunday, 22 November 2020

ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाय करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी दहावी, बारावी परीक्षांचा पॅटर्नही बदलून त्याचा निर्णयही लवकर व्हावा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त

मुंबई : ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाय करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी दहावी, बारावी परीक्षांचा पॅटर्नही बदलून त्याचा निर्णयही लवकर व्हावा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणीही या पत्रात केली आहे. 

हेही वाचा - विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडुका! BMC पोलिस संरक्षणात कारवाई करणार

शाळा सुरू करण्यापूर्वी केलेल्या शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये राज्यातील 500 हून अधिक शिक्षक कोव्हिड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. ही परिस्थिती पाहता मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील कोव्हिड संसर्गाची शक्‍यता असलेल्या सर्व भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवणे उचित ठरेल, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. पहिल्या सत्रात माध्यमिक विभागात ऑनलाईन शिक्षण बऱ्यापैकी झाले आहे. तरी प्राथमिक विभागात ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. किमान उर्वरित सत्रासाठी कृतीपुस्तिका, वर्कबुक, वर्कशीट, ऍक्‍टिव्हिस्ट बुक छापून हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवल्यास ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकेल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

हेही वाचा - वृद्धाच्या पायाला चार किलोची गाठ! शस्त्रक्रियेमुळे आठ वर्षांच्या दुखण्यातून सुटका

लस येत नाही तोवर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याची घाई करू नये. तसेच लस आल्यानंतर आरोग्य आणि पोलिस कर्मचारी यांच्या सोबतच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर आणि अंगणवाडी ताई यांना प्राधान्याने लस मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. 

Change the pattern of the tenth twelfth exam Demand of teacher MLAs to the Chief Minister

----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change the pattern of the tenth twelfth exam Demand of teacher MLAs to the Chief Minister