चक्रीवादळामुळे मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे-विमानांच्या वेळापत्रकात बदल

चक्रीवादळामुळे मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे-विमानांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई- निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. आज सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून सुटणाऱ्या विशेष रेल्वे आणि मुंबईहून सुटणारे विशेष विमान यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 

3 जून रोजी मुंबईहून सुटणाऱ्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मुंबईच्या आसपास मार्गावरुन जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या मार्गामध्येही बदल केले आहेत. मध्य रेल्वेनं ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे.

चक्रीवादळामुळे या ट्रेनच्या मार्गात बदल 

02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष ट्रेन 2.6.2020 ला या मार्गानं वळवली मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-दौंड व्हाया मनमाड (मडगाव- पनवेल- कल्याण- इगतपुरी- नाशिक रोडऐवजी)

06346 तिरुवनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ट्रेन 2.6.2020 ला मडगाव- लोंडा- मिरज- पुणे- कल्याण मार्गे वळविण्यात आली (मडगाव-पनवेल ऐवजी)

02432 नवी दिल्ली-तिरुअनंतपुरम स्पेशल ट्रेन 2 जून रोजी सूरत-वसई रोड- कल्याण- पुणे- मिरज- लोंडा-मडगाव मार्गे वळवण्यात आली. (सूरत-वसई रोड- पनवेल- मडगावऐवजी)

3.6.2020 ला सुटणारी 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम  स्पेशल ट्रेन मनमाड-दौंड व्हाया पुणे-मिरज-लोंडा- मडगांव (नाशिक रोड- इगतपुरी- कल्याण- पनवेल- मडगावऐवजी) वळवण्य़ात येईल. 

02431 तिरुअनंतपुरम-नवी दिल्ली विशेष ट्रेन 2.6.2020 रोजी सुरू होणारी मडगाव येथे नेहमीप्रमाणे असेल आणि आवश्यक असल्यास ती वळवण्यात येणार असल्याचं कोकण रेल्वेनं म्हटलं आहे.

विमान सेवेवरही परिणाम 

काही विमान कंपन्या केवळ मुंबईत पार्क असलेली विमानेच सोडणार आहेत. वादळादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. एअर एशिया, गो एअर, एअर इंडिया आणि स्पाइसजेट या कंपन्यांचा यात समावेश आहे. आज 25 ऐवजी काही विमानांचीच उड्डाणं येथून होऊ शकतील. तर काही उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. व्यतिरिक्त विमानतळावरील लहान खासगी विमान अन्य विमानतळांवर जाऊन तेथे उभी करावी, अशी सूचना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडकडून (मिआल) देण्यात आली आहे. जी विमाने बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांनी विमाने हँगरमध्ये उभी करण्याच्या सूचनाही मिआलनं संबंधितांना दिली आहे. 


राज्यासह मुंबईत असा असेल निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग


3 जून 

दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबागहून मुंबई किनारपट्टीवर येईल. त्यानंतर वरळीमार्गे ठाण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करेल. 

रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ठाणे पाचवड येथून चक्रीवादळ भिवंडी, उम्बरपाडा, वाडामार्गे इगतपुरीच्या दिशेला मार्गक्रमण करेल. 

4 जून 

पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ खोडाला पोहचेल. इगतपुरी येथून त्र्यंबकेश्वर, हरसुल, कपराडामार्गे वणीच्या दिशेनं मार्गक्रमण करेल. 

पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ वणी, सापुतारा येथून अभोणा, कळवण, सटाणा, नामपूरला मार्गे साक्री येथे धडकेल. 

पहाटे 4 वाजेच्या सुमारास साक्री म्हसदी येथून हे चक्रीवादळ लामकानी, चिमठाणेमार्गे वर्शीला धडकणार आहे. 

निसर्ग चक्रीवादळ सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वर्शी, थाळनेर येथून लामकानी, चिमठाणेमार्गे शिंदखेड्याला पोहचेल.

सकाळी 9 वाजेच्या सुमारास शिंदखेडा, जैतपूर येथून शिरपूरमार्गे चक्रीवादळ धुळ्यात धडकेल. 

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे चक्रीवादळ मध्यप्रदेशच्या खरगोणमध्ये धडकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com