मोठी बातमी - अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील सारथी संस्थेसंदर्भातील बैठकीत गोंधळ

सुमित बागुल
Thursday, 9 July 2020

आज सारथी संस्थे संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मात्र या सभेदरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : आज सारथी संस्थे संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मात्र या सभेदरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजी राजे यांना यांचावर न बसवता खाली खुर्चीवर तिसऱ्या रांगेत बसवलं गेल्याने तिथे उपस्थित नेते आणि मराठा समन्वयक चांगलेच नाराज झालेत आणि त्यांनी सभास्थळी आपली नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. 

नेमकं झालं काय ?

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अजित पवार यांच्या अध्यक्षतेत सारथी संस्थेसंदर्भात आज महत्त्वाची बैठक होती. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील एका मिटिंग हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलीये. या मिटिंग हॉलमध्ये एका बाजूला पोडियम म्हणजेच मंच आणि त्यासमोर खाली बसण्यासाठी खुर्च्यांची आसन व्यवस्था आहे. या बैठकीत आसन व्यवस्थेत छत्रपती संभाजी महाराज यांना मंचावर न बसवता खाली बसवण्यात आलं.

हेही वाचा : मुंबईकरांनो खबरदारी घेताय ना! शहरात कोरोनासह या आजारांच्या रुग्णांची नोंद

सोबतच त्यांना तिसऱ्या रांगेत बसवण्यात आलं. तिथे काही मराठा समाजाचे इतर निमंत्रित समन्वयक देखील उपस्थित होते. या समन्वयकांनी  सदर घटनेवर नाराजी व्यक्त करत छत्रपती संभाजी महाराज तिसऱ्या रांगेत बसलेत तर आम्ही बाहेर लोकांना काय उत्तरं देऊ असा प्रश्न उपस्थित केला. या सर्व नेते आणि समन्वयकानी संभाजी महाराजांना मंचावर बसण्यास सांगितलं. मात्र संभाजी महाराजांनी अत्यंत सामंजस्याने आपण सारथी संस्थेसाठी तोडगा काढण्यासाठी इथे आलो असल्याचं सांगितलंय. त्यामुळे मी एक सदस्य म्हणून खाली खुर्चीवरच बसेनअशी भूमिका घेतली. 

या मानापमान नाट्यानंतर अजित पवारांच्या दालनात ही बैठक होणार असल्याचं टीव्ही रिपोर्टमधून सांगण्यात आलं. 

chaos over seating arrangements during meeting called for sarathi organisation by ajit pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chaos over seating arrangements during meeting called for sarathi organisation by ajit pawar