
फेसबुकवर मैत्री करण पडलं महाग, 32 लाख रुपयांना गंडा
मुंबई - फेसबुकवरील मैत्रीमुळे मुंबईतील एका व्यक्तीला 24 लाखांहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. सायबर पोलिसांनी अलीकडेच झारखंडमधील सय्यद सैफ अहमद नावाच्या व्यक्तीला फसवणुकीच्या आरोपात अटक केली. आरोपी अहमदला गुरुवारी झारखंडहून मुंबईत आणण्यात आले.पोलिसांनी आरोपीने सना खान नावाने फेसबुकवर बनावट अक्काऊंट तयार केले. नंतर पीडित व्यक्तीशी मैत्री केली आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पैसे मागितल्याचा आरोपी आहे विशेष म्हणजे 2021 मध्ये अशाच प्रकारे याच पीडितेची सुमारे 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली अहमदने पोलिसांना दिली आहे. पीडितेची जवळपास ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची आरोपीने पोलिसांना माहिती दिली.
फेसबुकवर मैत्री
जानेवारीमध्ये, परळ येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय पीडित व्यक्तीला सना खान नावाच्या व्यक्तीकडून फेसबुकवर रिक्वेस्ट आली. पिडीत एका खाजगी कंपनीत नोकरीला होता आणि लग्नासाठी वधू शोधत होता. अहमदने पीडित इसमाला गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवले आणि कधी लग्नाच्या बहाण्याने, तर कधी आईच्या आजारपणाच्या नावाने पैशाची मागणी करू लागला.
वडीलांच्या खात्यातून पैसे हस्तांतरीत
पीडितेने केवळ त्याच्या बँक खात्यातूनच नव्हे तर वडिलांच्या खात्यातूनही पैसे आरोपीला दिले. तीन महिन्यांत, त्याने ‘साना’ या कथित व्यक्तीला 24.67 लाख रुपये पिडीत इसमाने दिले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिडीत इसमाचे वडील बँकेत गेले असता त्यांच्या नकळत त्यांच्या खात्यातून लाखो रुपये ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले आणि त्यांना धक्काच बसला.त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करून सर्व बँक खाती गोठवली. पोलिसांनी तपास करत आरोपीला झारखंडमधून अटक केली.
2021 मध्ये फसवणूक
2021 मध्ये या प्रकरणातील पिडीत व्यक्तीसोबत सोफिया नावाच्या दुसर्या 'स्त्रीने फेस बुकवर मैत्री करत पीडितेकडून 8 लाख रुपये उकळले होते. स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. मात्र तेव्हा पोलिसांना त्याचा माग काढता आला नाही परिणामी हे प्रकरण तिथेच थंडावले.
Web Title: Cheated For Rs 32 Lakh By Making Friends On Facebook
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..