
मुंबई : शहरात पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या अस्सल पनीरऐवजी दुधाची भुकटी आणि रसायनांच्या मिश्रणाने तयार केल्या जाणाऱ्या हलक्या प्रतीच्या चीज ॲनालॉगची सर्रास विक्री सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुन्हे शाखेच्या नियंत्रण पथकाने अँटॉप हिल परिसरात अस्सल पनीर म्हणून नागरिकांसह, दुग्धालये, हॉटेलांना विक्री होणारे ५५० किलो चीज ॲनालॉग जप्त केले. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनालयाच्या अधिकाऱ्यांनीही भाग घेतला.