प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्या बहिणीचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्या बहिणीचे निधन

प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्या बहिणीचे सोमवारी निधन झाले.

प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्या बहिणीचे निधन

मुंबई - प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्या बहिणीचे सोमवारी निधन झाले. राधा खन्ना यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती विकास खन्ना यांनी सोशल मीडियावरून दिली.

विकास खन्ना यांनी बहिण राधाचा एक फोटो शेअर करत माझी सोलमेट मला सोडून गेल्याचं म्हटलं आहे. अनेक आजारांशी तिने एका चॅम्पियनसारखा लढा दिला. पण शेवटी माझ्या कुशीत तिने अखेरचा श्वास घेतला. लव्ह यू राधा असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

विकास खन्ना यांनी वयाच्या १४ व्या वर्षी एका छोट्याशा पार्टीत जेवण बनवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी केलेल्या पदार्थांचे खूप कौतुक झाले होते. या कौतुकामुळे त्यांनी चक्क पार्टीसाठी जेवण बनवायचे पैसेही घेतले नव्हते. अनेकांनी त्यांच्या शेफ बनण्याच्या निर्णयावर नाक मुरडलं होतं.

Web Title: Chef Vikas Khanna S Wife Radha Passes Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India
go to top