

Chembur under-construction building accident
ESakal
मुंबई : चेंबूर येथील सुभाषनगर परिसरात शनिवारी (ता. २८) दुपारी एका बांधकातील इमारतीची परांची कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात सातव्या मजल्यावरून सहा मजूर खाली कोसळले. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित विकसक आणि कंत्राटदारावर कठोर कारवाईसह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.