चेंबूर : घटस्फोट पत्नी बोलत नसल्यासाचा राग मनात ठेवून केला खून! | Chembur crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

चेंबूर : घटस्फोट पत्नी बोलत नसल्यासाचा राग मनात ठेवून केला खून!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेंबूर : घटस्फोट (Divorce) होऊनही माझ्याशी बोलत नाही, याचा राग मनात धरून पतीने घटस्फोटित पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची (wife murder) घटना चेंबूरमध्ये बुधवारी (ता. १०) घडली. आकांक्षा खरटमोल (२१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी (RCF Police) अक्षय आठवले (Akshay athvale arrested) (२५) याला अटक केली आहे.

हेही वाचा: परबांना शंभर कोटी मिळाल्यास एसटीचे विलीनीकरण करतील; प्रसाद लाड यांचा टोला

चेंबूरच्या आरसीएफ पोलिस ठाणे हद्दीतील वाशीनाका परिसरातील अशोक नगरमध्ये राहणाऱ्या मृत आकांक्षाचा अक्षय याच्यासोबत डिसेंबर २०१९ ला प्रेमविवाह झाला होता. अक्षय लग्न होऊनही कित्येक महिने काम करीत नसल्याने या दोघांचा घटस्फोट झाला. त्यामुळे आकांक्षा आपल्या माहेरी राहत होती. ती साई हॉस्पिटलमध्ये कामाला होती. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घराजवळून रिक्षा पकडून ती कामाला जात असताना, अक्षयने तिचा दुचाकीने पाठलाग केला.

तसेच रिक्षा भररस्त्यावर अडवून तिला तू माझ्याशी बोलत का नाहीस, असा जाब विचारला. यानंतर त्याने तिला रिक्षा बाहेर काढून धारदार हत्याराने तिच्या तोंडावर, हातावर, डोक्यावर वार केले. यात ती जबर जखमी झाली. भाऊ अनिकेत खरटमोल याने तिला उपचाराकरिता रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी आरसीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब घावटे अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top