परबांना शंभर कोटी मिळाल्यास एसटीचे विलीनीकरण करतील; प्रसाद लाड यांचा टोला | Anil Parab | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasad lad

परबांना शंभर कोटी मिळाल्यास एसटीचे विलीनीकरण करतील; प्रसाद लाड यांचा टोला

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) सध्या शंभर कोटी रुपयांखाली (hundred crore) बोलत नाहीत, खरमाटेशिवाय अन्य कोणाला भेटायला त्यांना वेळ नाही. मात्र त्यांना शंभर कोटी रुपये मिळाले तर ते एसटी महामंडळाचे (st bus corporation) राज्य शासनात (mva government) जरुर विलीनीकरण (merge demand) करतील, असा टोला राज्य भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी लगावला आहे.

हेही वाचा: कुटुंबीयांशी चर्चा करुनच मुख्यमंत्री घेणार शस्त्रक्रियेचा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले असून त्यात प्रवाशांचेही हाल होत आहेत. सर्वच बाजूंनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याने न्यायालयात जाऊनही परिस्थिती जैसे थे असल्याचे बोलले जात आहे. सध्या कोकण दौऱ्यावर असलेले प्रसाद लाड यांनी याबाबत परिवहन मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या वसुलीचे प्रकरण गाजते आहे. त्याचा दाखला देत लाड यांनी वरील टोला लगावला आहे.

परिवहनमंत्री अनिल परब सध्या खूपच बिझी आहेत, संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. खरमाटे वगळता ते कोणालाही भेटत नाहीत. अशाच माध्यमातून परिवहनमंत्र्यांना शंभर कोटी रुपये मिळाले तर ते एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण जरुर करतील. मात्र यांच्या शंभर कोटी रुपयांना आपण नक्कीच गाडून टाकू. आता राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पाडेल, त्यांना मेस्मा किंवा अवमान याचिकेची भिती दाखवेल. मात्र भाजप तुमच्या साह्याला धावून येईल, तुम्हाला गरज लागेल तेव्हा मी व निलेश राणे येथे येऊ, असेही आश्वासन लाड यांनी रत्नागिरी येथे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिले.

ही तर तालिबानशाही

पोस्टाप्रमाणेच एसटी देखील गावागावात लोकांच्या मदतीला, अडचणीला जाते. मात्र रत्नागिरीचे पालकमंत्री येथे येतच नाहीत, एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही. उलट शेकडो संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही तालिबानशाही आहे, पण आम्ही राजकारणासाठी नाही तर लालपरीला जिवंत ठेवण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, अशी ग्वाही देखील लाड यांनी दिली.

loading image
go to top