Chembur Air Pollution: विषारी वायूमुळे जीवाला धोका; चेंबूरमधील कारखान्यातून प्रदूषण, आरोग्याचा प्रश्न गंभीर
RCF Plant: चेंबूर येथील रहिवाशांना रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे डोळ्यांना जळजळ, त्वचेला खाज आणि श्वसनाचे आजार यांचा सामना करावा लागत आहे. तरीही, या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात आलेली नाही.
चेंबूर : येथील आरसीएफ कंपनी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना गेल्या दोन दिवसांपासून डोळे, त्वचा जळजळणे व मळमळ यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. अशा वाढत्या प्रदूषणामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.