
मुंबई: एम पश्चिम प्रभागांतर्गत येणाऱ्या चेंबूर, टिळक नगरसह आसपासच्या भागात वाढत्या कोरोना प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच सरासरी 30 नवीन रुग्ण सापडत आहेत. तर, जानेवारीत ही संख्या 10 ते 15 दरम्यान होती.
पालिकेने त्यांच्या क्षेत्रातील सोसायट्यांना नवीन कोविड नियम जारी करून खबरदारी घ्यायला सांगितले आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास प्रभागात लॉकडाऊन होण्याचेही संकेत आहेत. विशेष म्हणजे, एम पश्चिम प्रभागातील कोरोना वाढीचा दर 0.28 टक्क्यांवर पोहोचला आहे. संपूर्ण मुंबईचा दर 0.14 टक्के आहे. वॉर्ड अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, एका कुटुंबातील 6 ते 7 लोकांना या विषाणूची लागण होत आहे.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे आणि बाजारामध्ये गर्दी वाढल्याने हा संसर्ग पसरत आहे. लोकांकडून कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जात नाहीत. यासह समारंभ आणि विवाहानंतर संसर्ग वाढल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, समारंभात गर्दी झाल्यामुळे आणि नियमांचे पालन न केल्यामुळे लोक जास्त प्रमाणात संसर्गित होत आहेत.
फेरीवाले आणि दुकानदारांची चौकशी
चेंबूर, टिळकनगर, सिंधी कॉलनी आणि इतर भागांतील बाजारपेठेत दररोजच्या वस्तू खरेदीसाठी जातात. या परिस्थितीत तिथे गर्दी जास्त असते. कोणीही अनवधानाने सुपरस्प्रेडर होऊ नये म्हणून आम्ही फेरीवाले आणि दुकानदारांची कोरोना तपासणी सुरू केली आहे. सध्या दोन दिवसांत नवीन केसेस कमी आहेत. मात्र, पुढच्या एका आठवड्यात किती प्रकरणे समोर येत आहेत हे पाहिल्यानंतर एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचू शकतो.
डॉ. भूपेंद्र पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एम पश्चिम वॉर्ड
हे आहेत नवे नियम
सोसायटींना या नवीन नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
दूध विक्रेते व नोकरांचे तापमान तपासून सोसायटीमध्ये प्रवेश द्यावा.
जर एखाद्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास संपूर्ण कुटुंबास 14 दिवस क्वांरटाईन रहावे लागेल.
कुटुंबातील इतर सदस्यांचीही तपासणी केली जाईल.
पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी बंधनकारक आहे.
मुंबईत 493 नवीन रुग्ण
सोमवारीही राज्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या 3, 365 नोंदली गेली. त्यापैकी 493 रुग्ण मुंबईत आढळले. तर, राज्यात 23 आणि मुंबईत 3 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सक्रीय रूग्णांची संख्या 36,201 आहे, त्यापैकी 4120 सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत.
हेही वाचा- ''माझ्या कोणत्याही ट्विटमुळे हिंसाचार नाही'', कंगनाचा मुंबई उच्च न्यायालयात दावा
प्रकरणांमध्ये वाढ होण्याची प्रमुख 4 कारणे
मुंबईत कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येची चार प्रमुख कारणे आहेत. पहिले परदेशातून येणारे प्रवासी, दुसरे इतर राज्यातून येणारे प्रवासी, तिसरे लोकल ट्रेनची सुरूवात आणि चौथे कारण म्हणजे वाढवलेल्या चाचण्यांची संख्या.
सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त (आरोग्य)
चाचण्या टाळण्यासाठी प्रवाश्यांकडून केरळ मार्गाची निवड
पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मध्यपूर्वेकडून मुंबईत येणारे बरेच प्रवासी चाचणी आणि अलगीकरण टाळण्यासाठी स्वत:चे कौशल्य दाखवत आहेत. प्रवासी मुंबईऐवजी केरळ आणि हैदराबाद विमानतळांवर उतरतात जिथे चाचणीचे जास्त बंधन नाही आणि तेथून मुंबईसाठी डोमेस्टिक विमानाने प्रवास करतात. केरळमधून येणाऱ्यांची चौकशी सुरू आहे, पण, इतर काही राज्यांतून येणार्या प्रवाशांचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Chembur Tilak Nagar lockdown may happen again 30 new patients corona every day February
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.