esakal | चेंबूर दुर्घटना: "पालिकेने सर्वेनंतर रहिवाशांना नोटीस पाठवलीच नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

चेंबूर दुर्घटना: "पालिकेने सर्वेनंतर नोटीस पाठवलीच नाही"

चेंबूर दुर्घटना: "पालिकेने सर्वेनंतर नोटीस पाठवलीच नाही"

sakal_logo
By
विराज भागवत
  • शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिका प्रशासनावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची टीका

  • डोंगराळ भागातील रहिवाशांना कायमस्वरूपी सुरक्षित घरं देण्याचे नवाब मलिकांचे आश्वासन

चेंबूर: मुंबईतील काही भागात शनिवारी मध्यारात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबईमध्ये तीन दुर्दैवी घटनांमध्ये 25हून अधिक जणांचा मृत्यू झाला. चेंबूरमध्ये 17, विक्रोळीमध्ये सात आणि भांडूपमध्ये एक जण दगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. केंद्र व राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना मदतदेखील जाहीर करण्यात आली. चेंबूरला घडलेल्या घटनेनंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी डोंगराळ भागातील रहिवाशांना कायमस्वरूपी सुरक्षित घरे देण्याचे आश्वासन दिले. तसेच, पालिकेने सर्वेक्षणाच्या वेळी या रहिवाशांना धोकादायक इमारत असल्याची नोटीस पाठवली नसून ही बाब अतिशय गंभीर आहे, असेही मलिक म्हणाले. (Chembur wall collapse incident Minister Nawab Malik slams Shivsena Run BMC Officials)

हेही वाचा: मुंबईकरांनो, जरा जपून... पावसाबद्दल हवामान खात्याकडून इशारा

एका ठिकाणी भिंत कोसळून दुर्घटना झाली तर दुसरीकडे दरड कोसळल्याने दुर्घटना झाली. पावसापूर्वी पालिका प्रशासनाकडून जे धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केलं गेलं त्यात या ठिकाणांना कोणत्याही नोटीसा देण्यात आल्या नव्हत्या, ही घटना अतिशय गंभीर आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय एनडीआरएफकडूनही दोन लाखांची मदत लागू होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सध्या या ठिकाणी डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी घरे देण्यासाठी आम्ही बैठक घेऊन उपाययोजना करू, असं आश्वासन मंत्री नवाब मलिक यांनी दिले.

हेही वाचा: योगी सरकारच्या 'हम दो हमारे दो' पॉलिसीवर राऊत म्हणतात...

या ज्या दुर्घटना घडल्या त्यासाठी कोणालाही जबाबदार ठरवणं असं शक्य नाही. कारण अतिवृष्टीमुळे प्रचंड पाऊस रात्रभर पडतच होता. त्यातच पावसाच्या पाण्याचा मारा होत असल्याने काही ठिकाणी दुर्घटना झाल्या. अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कोणालाही जबाबदार धरणं खूपच घाईचे ठरेल, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.

loading image