मुंबईत अंमली पदार्थ विक्रीचा सुळसूळाट; कोट्यवधींची तस्करी होत असल्याची माहिती

तुषार सोनवणे
Monday, 30 November 2020

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या अनेक कारवायांमध्ये कोट्यावधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. या अनेक प्रकरणांमध्ये शेकडो आरोपींना तुरूंगात पाठवण्यात आले आहे

मुंबई - मुंबईत ड्रग्स तस्करीचा सुळसूळाट झालाय का असा प्रश्न सध्या पडतोय. शहरातील उच्चभ्रू सोसायट्यांपासून ते झोपडपट्टीमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात ड्रग्स माफियांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या अनेक कारवायांमध्ये कोट्यावधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. या अनेक प्रकरणांमध्ये शेकडो आरोपींना तुरूंगात पाठवण्यात आले आहे. 

हेही वाचा - सरनाईक पिता-पुत्राची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता

मुंबईत ड्रग्स विकून करोडो रुपये कमावले जातात. सतत होत असलेल्या तस्कारींमुळे मुंबई ड्रग्समाफियांचा केंद्रबिंदू बनू पाहत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरात 35 प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. त्यात 47 आरोपींना अटकही करण्यात आली आहे  या कारवायांमध्ये 364 किलो 244 ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ज्याची किंमत 20 कोटींपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा - पाणी पुरीसाठी अस्वच्छ पाण्याचा वापर करणाऱ्या वेलकम स्वीटस अँड स्नॅक्सवर कारवाई

मुंबईत गेल्या 10 वर्षात अब्जांवधींची उलाढाल ड्रग्सच्या तस्करीत/विक्रीत झाली आहे. ही सर्व माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आली आहे. त्यामुळे माहिती नसलेल्या किंवा पोलिसांच्या रडावर न आलेल्या असंख्य प्रकरणांचा विचार करता. सध्या समोर आलेली माहिती ही हिमनगाचं टोक असल्याचे म्हटले जात आहे. ड्रग्जविक्रीचा पैसा नेहमीच दहशतवादी आणि वाईट कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे मुंबईतील ही ड्रग्ज तस्करी किंवा विक्री पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. 

The chemical sales rise in Mumbai crores are being Money transactions

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The chemical sales rise in Mumbai crores are being Money transactions