सरनाईक पिता-पुत्राची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता

पूजा विचारे
Monday, 30 November 2020

आता पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनाही पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. 

मुंबईः  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी या आठवड्यात अंमलबजावणी संचलनालय चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांना ईडीनं याआधीच चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलेत. दुसरीकडे प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनाही पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. 

क्वारंटाईन असल्यामुळे प्रताप सरनाईक ईडीकडे चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे क्वारंटाईन संपल्यावर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. यावेळी विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात घेऊन जाऊन ४ तास चौकशीही करण्यात आली होती. त्यामुळे विहंग यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. 

अमित चांदोळेला न्यायालयीन  कोठडी

टॉप ग्रुप प्रकरणी तपास करणा-या सक्त वसुली संचलनालय(ईडी) अटक केलेले अमित चांदोळे यांना न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.  चांदोळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय मानले जातात.

अधिक वाचा-  पाणी पुरीसाठी अस्वच्छ पाण्याचा वापर करणाऱ्या वेलकम स्वीटस अँड स्नॅक्सवर कारवाई

लंडन येथील मालमत्ता प्रकरणी ईडी चांदोळे यांची 12 तास चौकशी केल्यानंतर 25 नोव्हेंबरला मनी लाँडरींग प्रतिबंधक कायदा(पीएमएलए) कलम 3 आणि 4 अंतर्गत त्यांना ईडीने अटक केली होती. याप्रकरणी रविवारी न्यायालयाने त्यांना डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहेत. टॉप ग्रुपला मिळालेल्या एमएमआरडीएच्या कंत्राटात गैरव्यवहार करून त्यातील दर महिना सहा लाख रुपये त्यांना मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई आणि ठाण्यातील 10 ठिकाणी शोध मोहिम राबवली होती. त्यात चांदोळेच्या संबंधित ठिकाणाचाही सहभाग होता. याप्रकरणी ईडीच्या रडावर आलेल्या व्यावसायिक देवाण-घेवाणीबाबतची माहिती चांदोळेला असल्याचा संशय आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Pratap Sarnaik vihang son likely be questioned by ED


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratap Sarnaik vihang son likely be questioned by ED