चेन्नईत उपनगरीय सेवा सुरू; मुंबईत कधी सुरू होणार?

तुषार सोनवणे
Wednesday, 23 December 2020

चेन्नई उपनगरीय रेल्वेसेवा, नॉनपिक तासांमध्ये सामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. चेन्नई लोकल सुरू झाल्यामुळे मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार असा सवाल मुंबईकर प्रवासी विचारत आहेत. 

मुंबई -  आजपासून चेन्नई शहरातील उपनगरीय लोकल ट्रेन सेवा सुरू झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबत घोषणा केली आहे. चेन्नई उपनगरीय रेल्वेसेवा, नॉनपिक तासांमध्ये सामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. चेन्नई लोकल सुरू झाल्यामुळे मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार असा सवाल मुंबईकर प्रवासी विचारत आहेत. 

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यातील दळणवळण बंद करण्यात आले. लोकल आणि लांब पल्ल्यांच्या ट्रेन बंद करण्यात आल्या. कोरोना संसर्ग आता कमी होत असताना, मिशन बिगीन अगेन सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्व व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. यात मुंबई लोकल प्रवासाची परवानगी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याांना देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व महिलांना गर्दीच्या वेळा वगळता लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. परंतु सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी तसेच प्रवाशांसाठी मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरू होणार असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chennai local service start when in mumbai