
याठिकाणी घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल गन व पल्स ऑक्सिमिटरने तपासणी करण्यात आली. तसेच शौचालयाची दररोज स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे सोशल डिस्टनसिंग राखण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्टँडची व्यवस्था करण्यात आली.
दहिसर : मुंबईत कोरोनाची सुरुवात झाली ती वरळी कोळीवाडा परिसरातून. मुंबईतील तो पहिलाच हॉटस्पॉट ठरला. आरोग्य यंत्रणा आणि महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांनतर वरळी कोळीवाडाचा कोरोनामुक्तीच्या दिेशेने प्रवास सुरु झाला. मात्र तोपर्यंत धारावीत कोरोनाने एन्ट्री केली होती. धारावीतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनापुढे मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र धारावी पॅटर्न राबवून प्रशासनाने धारावीतील कोरोना नियंत्रणात आणला. त्यानंतर मात्र उत्तर मुंबईत मात्र कोरोनाने हातपाय पसरले होते. त्यातही दहिसर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरला होता.
अखेर बिहारचे एसपी विनय तिवारी 'बॅक टू पॅव्हेलियन'
दहिसर आर/ उत्तर प्रभागात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या चिंतेचा विषय बनून राहिली होती. हे लक्षात घेता प्रभाग क्रमांक 1च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पालिका डॉक्टर अधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने विभागात दररोज आरोग्य शिबिर आयोजित करून आता विभागात कोरोनाच्या संसर्गाला आळा बसला आहे. याठिकाणी 50 हजार लोकसंख्या असलेल्या दाटीवाटीने बसलेल्या गणपत पाटील नगर या वसाहतीत कोरोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका होता. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहिसरमध्ये 'चेस द व्हायरस' मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार परिसरात मोहिम राबवण्यात आली.
मुसळधार पावसाचा फटका 'कोविड केअर सेंटर'ला, रुग्णांचे प्रचंड हाल
याठिकाणी घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल गन व पल्स ऑक्सिमिटरने तपासणी करण्यात आली. तसेच शौचालयाची दररोज स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे सोशल डिस्टनसिंग राखण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्टँडची व्यवस्था करण्यात आली. सर्दी, खोकला,ताप अशी लक्षणं आढळल्यास रुग्णांवर त्वरित उपचार करण्यात आले. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या नेतृत्वात शाखाप्रमुख राजू इंदुलकर, जतीन परमार, लालचंद पाल, महिला संघटक ज्यूडी मेंडोसासह शिवसैनिकांची एक टीम विभाग डॉक्टरासोबत घरोघरी जाऊन काम करीत होती. अखेर त्यांच्या प्रयत्न यश मिळत असल्याचे आता दिसून येत आहे.
एका अनोख्या गावाची कहाणी ! इथे मित्राला नावानी हाक मारली तर भरावा लागतो दंड
शुक्रवारी प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नाही. आर / उत्तर प्रभागातील सर्व 8 प्रभागात कोरोनाची लागण झालेले आतापर्यंत 2 हजार 803 रुग्ण आढळले असून त्यातील 2 हजार 5 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 590 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वात कमी 204, प्रभाग क्रमांक दोन 384 ,प्रभाग क्रमांक तीन 291, प्रभाग क्रमांक चार 370,प्रभाग क्रमांक पाच 521,प्रभाग क्रमांक सहा 407,प्रभाग क्रमांक सात 329 व प्रभाग क्रमांक आठ 231 मध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत.
---
संपादन : ऋषिराज तायडे