
मुंबई : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. दुसरीकडे जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची सोमवारी (ता. एक) मुंबईत बैठक बोलावली आहे.