

Maharashtra Sadan Case Verdict: Court Acquits Minister Chhagan Bhujbal
Sakal
मुंबई : दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’च्या बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने आज त्यांच्यासह ४६ जणांना या प्रकरणातून दोषमुक्त केले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यातून भुजबळांना आधीच दोषमुक्त केलेले आहे. त्यामुळे त्याआधारे दाखल केलेले सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) प्रकरण कायम राहू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.