Chhagan Bhujbal
sakal
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील ग्रंथालयाच्या कंत्राटासाठी लाच घेतल्याप्रकरणी दशकभरापूर्वी दाखल खटल्यातून मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांना विशेष न्यायालयाने गुरुवारी (ता. २४) दोषमुक्त केले. विशेष म्हणजे भुजबळ यांच्याविरुद्ध दाखल हा शेवटचा प्रलंबित खटला असून, त्यातही ते दोषमुक्त झाल्याने त्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळाला आहे.