छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांच्या मागे सर्व महाराष्ट्र, नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य

सुमित बागुल
Tuesday, 29 December 2020

छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेने केलीय.

मुंबई : ओबीसी आणि मराठा या दोन समाजांमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार तेढ निर्माण करत असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेने केलीय. आपल्या मागणीसाठी त्यांनी आज मुंबईत राज्यपालांची भेट घेतलीय. या मागणीनंतर OBC येते प्रकाश शेंडगे यांनी मराठा नेत्यांचं मत चुकीचे असल्याचं म्हंटल आहे. 

महत्त्वाची बातमी : शाळांसंदर्भात मोठी बातमी : मुंबई, ठाणे, रायगडमधील शाळा २६ जानेवारीपूर्वी खुल्या होणार ?

काय म्हणालेत प्रकाश शेंडगे : 

आज महाराष्ट्रातील काही मराठा नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगात सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या मराठा नेत्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि महाविकास आघाडी सरकारमधी काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी या दोन्ही मराठा नेत्यांकडून मराठा आरक्षणाला विरोध केला जात असल्याचे कारण देखील या नेत्यांनी राज्यपालांना दिलं आहे.

दरम्यान हे धादांत खोटं आहे. या महाराष्ट्रातील OBC धनगर आणि भटके मुक्त समाजातील नागरिकांची हीच भूमिका होती की मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण देऊ नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील हीच भूमिका आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मात्र असं असतानाही या दोन नेत्यांचा राजीनामा कशासाठी मागितला जातोय. या दोन्ही मंत्र्यांच्या मागे महाराष्ट्रातील OBC, धनगर समाज, बारा बलुतेदार, भटके विमुक्त सर्वच जण ठामपणे उभे आहेत. याची नोंद घ्यावी असं OBC नेते प्रकाश शेंडगे म्हणालेत.

Chhagan bhujbal vijay wadettiwar demand for resignation by all maharashtra cabinet maratha organisation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan bhujbal vijay wadettiwar demand for resignation by all maharashtra cabinet maratha organisation