शाळांसंदर्भात मोठी बातमी : मुंबई, ठाणे, रायगडमधील शाळा २६ जानेवारीपूर्वी खुल्या होणार ?

शाळांसंदर्भात मोठी बातमी : मुंबई, ठाणे, रायगडमधील शाळा २६ जानेवारीपूर्वी खुल्या होणार ?

मुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगडमधील शाळांसंदर्भातील मोठी बातमी समोर येतेय. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट झालेली पाहायला मिळते आहे. अशात मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभाग तयार असल्याचं समजतंय. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये प्रजासत्ताक दिनाआधी म्हणजेच २६ जानेवारीआधी शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल मुंबई महापालिका शिक्षण विभागाने मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला आहे.  याबाबतचा अंतिम निर्णय मुंबई महापालिका आयुक्त घेणार आहेत. 

कोरोनाची परिस्थितीत पाहता २३ नोव्हेंबर रोजी मुंबई विभागातील सुरु होणाऱ्या शाळा न सुरु करण्याचा निर्णय झाला होता. जिथे शाळा सुरु करण्याचा निर्णय झालाय त्या जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीला सुरु होणार आहेत. अशात मुंबई महापालिकेचा विचार केला तर मुंबई, ठाण्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली पाहायला मिळतेय. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर देखील कमी होऊन कोरोना डबलिंग रेट अधिकाधिक दिवसांचा होतोय.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने देखील आता शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईचे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे शाळा सुरु करण्यासाठीचा अहवाल सादर केला आहे. दरम्यान मुंबई मनपा आयुक्त यांनी निर्णय घेतल्यास २६ जानेवारीआधी मुंबई मनपातील तसेच ठाणे आणि रायगडमधील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.  

education department of BMC submits report to start schools in mumbai before 26th January

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com