कर्जतमध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर; स्मारक, संग्रहालयासह पर्यटन सुविधा

Chhatrapati Shivaji Maharaj Temple: रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पात स्मारक, संग्रहालय आणि पर्यटकांसाठी विविध सुविधांचाही समावेश असणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Temple Built In Karjat

Chhatrapati Shivaji Maharaj Temple Built In Karjat

ESakal

Updated on: 

कर्जत : कर्जत शहरातील उल्हास नदीकिनारी आमराई येथील नाट्यगृहाशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. तसेच आकुर्ले येथून कर्जत शहराला जोडणारा पूल बांधण्यात येणार आहे. परिवर्तन विकास आघाडीने ४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या दोन्ही प्रकल्पांची घोषणा केली. उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

Loading content, please wait...