कल्याणमध्ये शिवरायांच्या आरमाराचे देशातील पहिले स्मारक! नौदलाच्या इतिहासासह जहाजांच्या प्रतिकृती उभारणार

Kalyan News: कल्याणमध्ये शिवरायांच्या आरमाराचे देशातील पहिले स्मारक उभारले जाणार आहे. शिवरायांच्या आरमाराचा गौरवशाली इतिहास नागरिकांना समजण्यासाठी अभ्यासपूर्ण स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj navy

Chhatrapati Shivaji Maharaj navy

ESakal

Updated on: 

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्यांची आणि दूरदृष्टीची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी कल्याण पूर्वेतील कचोरे-नेतीवली टेकडी परिसरात देशातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज आरमार स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. या स्मारकाच्या माध्यमातून केवळ महाराजांचा पुतळा उभारण्याऐवजी त्यांच्या आरमाराचा गौरवशाली इतिहास नागरिकांना समजावा, यासाठी अभ्यासपूर्ण स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com