छोटा राजनच्या टोळीकडून माथाडी कामगारांना धमक्या; मनसेने केली तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छोटा राजनच्या टोळीकडून माथाडी कामगारांना धमक्या; मनसेने केली तक्रार

मुंबईतील विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांकडून शासनाची आणि कामगारांची फसवणूक केली आहे.

छोटा राजनच्या टोळीकडून माथाडी कामगारांना धमक्या; मनसेने केली तक्रार

मुंबई - मुंबईतल्या माथाडी कामगारांचे त्यांच्या ठेकेदारांकडे वेतन थकले आहे. मात्र स्थानिक पातळीवर ठेकेदार वेतन न देण्याच्या मानसीकतेत असून. उलट छोटा राजन यांच्या टोळीतील स्थानिक गावगुंडाकडून माथाडी कामगारांना धमकवत असल्याचा आरोप मनसेचे उपाध्यक्ष महेश जाधव यांनी केला आहे. त्यासोबत कामगार मंत्री सुरेश झाडे यांची भेट घेऊन माथाडी कामगारांच्या प्रलंबीत मागण्यांवर सुद्धा चर्चा केली असून, समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांकडून शासनाची आणि कामगारांची फसवणूक केली आहे. सुमारे 200 कोटी रूपयांचा अपहार केला असून, याला कामगार सहआयुक्त, विविध बोर्डाचे अध्यक्ष तसेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष जबाबदार असल्याचाही गंभीर आरोप मनसेने कामगार मंत्र्यांना दिलेल्या तक्रारी केला आहे. त्याशिवाय बीसीसीआय सिमेंट कंपनी कळंबोलीमधील माथाडी कामगारांना गेली ३ महिन्यांपासून ठेकेदाराकडून काम करूनही पगार दिला जात नाही. रेल्वे बोर्ड व कामगार आयुक्त यांना वारंवार संयुक्त बैठका तसेच पत्रव्यवहार करूनही ठेकेदार पत्राला मान न देता खुले आव्हान देत आहे. त्यामूळे कामगारांचा थकीत व चालु मासिक पगार तात्काळ चालू करण्याची मागणी सुद्धा जाधव यांनी केली आहे.