घाटकोपर - मानखुर्द उड्डाण पुलाच्या नामकरणावरुन शिवसेनेची कोंडी | Kishori Pednekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena-bjp

घाटकोपर - मानखुर्द उड्डाण पुलाच्या नामकरणावरुन शिवसेनेची कोंडी

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोड (Ghatkopar-mankhurd flyover) रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या नामकरणावरुन (flyover naming) भाजपने (bjp) शिवसेनेची (shivsena) कोंडी केली आहे. महापालिकेच्या होणाऱ्या सभेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (condolence to babasaheb purandare) यांना श्रध्दांजली वाहाण्यात येणार आहे. याचवेळी या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे नाव देण्याचा ठराव करावा अशी मागणी भाजपने महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: मुंबई उपनगर हाउसिंग फेडरेशन शिवसेनेकडे; अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

या उड्डाण पुलाच्या नामकरणाचा प्रस्ताव गेल्या दिड वर्षांपासून प्रलंबीत आहे.त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून भाजपकडून या नामकरणासाठी वेळोवेळी मागणी केली जात आहे.मात्र,त्यावर निर्णय होत नाही. १ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या उड्डाण पुलाचे उदघाटन केले. त्यापुर्वी प्रशशसनाने पुल वाहतुकीसाठी सुरु होत नसल्याने नामकरण करण्यास असमर्थता दर्शवली होती. मात्र,आता पुलही वाहतुकीसाठी सुरु झाला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शिवकार्यात वेचले आहे. येत्या महासभेत बाबासाहेब यांना श्रध्दांजली वाहाण्यात येणार आहे. त्याचबरोबर या पुलाच्या नामकरणाचा ठरावही करावा अशी मागणी भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी महापौर पेडणेकर यांना दिले आहेत. हा प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ करणे हे शिवप्रेमींच्या दृष्टीने करंटे पणाचा ठरेल. शिवसेना महाराष्ट्राची अस्मीता असलेल्या छत्रपतींना विसरली की यात दुसरा कोणता राजकीय डाव आहे असा संशयही शिंदे यांनी उपस्थीत केला.

loading image
go to top