
कोरोना संसर्ग काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या चिकन विक्रेत्यांवर पुन्हा एकदा संक्रात येण्याची शक्यता आहे.
मुंबईः कोरोना संसर्ग काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या चिकन विक्रेत्यांवर पुन्हा एकदा संक्रात येण्याची शक्यता आहे. देशात सध्या सुरु असलेल्या बर्ड फ्लू साथीच्या चर्चेमुळे ग्राहकांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरवल्यास मोठी आर्थिक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर चिकन विक्रेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
चिकन, मांस, मासे खाल्ल्याने कोरोनाचा संसर्ग होतो अशा प्रकारची अफवा पसरल्याने ग्राहकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवल्याचा परिणाम म्हणून 2020 या वर्षाच्या सुरुवातीला चिकनचे दर किलो मागे 30 ते 40 रुपयांवर आले होते. चिकनच्या या गडगडलेल्या दरांचा फटका होलसेल आणि किरकोळ बाजाराला बसला आहे.
चिकनची विक्री करणाऱ्या अनेक दुकानदारांना याचा फटका बसला आहे. अनेक विक्रेत्यांचे 2020 या वर्षाचे आर्थिक गणित कोलंमडले होते. देशात कोरोनाचा प्रकोप काही प्रमाणात कमी होताच सरकारनं जाहीर केलेल्या अनलॉकमुळे तसेच करोनाचा संसर्ग चिकन खाल्याने होत नसल्याचे कालांतराने स्पष्ट झाल्याने 2021 या नव्या वर्षात उत्साहात असलेल्या विक्रेत्यांच्या उत्साहावर नव्याने पुन्हा निर्माण झालेल्या बर्ड फ्लूच्या संकटामुळे विरजण पडले आहे. चिकन खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडण्याची धास्ती विक्रेते व्यक्त करताना दिसत आहेत.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पोल्ट्री मधून कमी दरात खरेदी तर विक्रेत्यांना मात्र तोच दर
किरकोळ चिकन विक्रेत्यांना होलसेल दरात कोंबड्या पुरवणाऱ्या विक्रेत्यांकडून पोल्ट्री व्यवसायिकांकडून 5 ते 10 रुपये प्रति नगानुसार स्वस्त दरात कोंबड्यांची खरेदी करण्यात येत असून किरकोळ विक्रेत्यांना मात्र आहे. त्याच दरात कोंबड्या विकल्या जात असल्याने पनवेल परिसरातील चिकनचे दर कमी झालेले नसल्याची माहिती कामोठे वसाहतीमधील एका चिकन विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
इतर वेळेत दिवसाला 40 ते 50 कोंबड्या विकल्या जात होत्या. मात्र सध्या चिकन खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने दिवसाला केवळ 2 ते 3 कोंबड्या विकल्या जात आहेत.
शाकीर सिदक्की, चिकन विक्रेता
पनवेल परिसरात किरकोळ विक्रेत्यांकडे चिकनचे दर कमी करण्यात आलेले नाहीत. मात्र ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीकडे पाठ फिरवल्यास येत्या काही दिवसात दर कमी करावे लागणार आहेत.
शारुख शेख, चिकन विक्रेता.
अधिक वाचा- TRP Case: विशेष तपास पथकाकडून 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Chicken sellers facing economic problem due bird flu crisis corona again